केरळमध्ये २४ तासाचं लॉकडाऊन.

24-hour lockdown in Kerala.

केरळमध्ये २४ तासाचं लॉकडाऊन.

केरळ:  केरळमध्ये, कोविड -19 चा वेगवान प्रसार कमी करण्यासाठी आज 24 तासांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, फक्त आपत्कालीन सेवा चालवल्या जात आहेत.   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केरळनं २४ तासाचं लॉकडाऊन लावला आहे.  याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कोविड प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने खाजगी रुग्णालयांना कोविड-19 रुग्णांसाठी 50 टक्के खाटा राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बहुतांश खासगी वाहनांना प्रवास करण्याची बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी तपासणी वाढवली आहे. रेस्टॉरंटला केवळ घरपोच खाद्यपदार्थ देण्याची मुभा देण्यात आली आहे.

केरळमध्ये गेल्या 24 तासांत 45 हजार 136 कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे आणि 21 हजार 324 बरे झाले आहेत. चाचणी सकारात्मकता दर 44.8% पर्यंत वाढला आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या  दोन लाख 47 हजार 227 वर पोहोचली आहे.

केरळमध्ये सध्या सुमारे अडीच लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *