In some districts of the state, schools will resume from tomorrow, while in some places, the decision has been postponed.
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये शाळा उद्यापासून पुन्हा सुरू तर काही ठिकाणी निर्णय लांबणीवर.
मुंबई : पुणे जिल्ह्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता किमान पुढचा एक आठवडा शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या कोरोनाविषयक बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शाळा आता सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्याबद्दलचा निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. रुग्णसंख्या कमी होईपर्यंत कोरोनाविषयीची यापूर्वीचीच नियमावली कायम ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही पुढच्या आदेशापर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा उद्या पासून सुरू होत आहेत. त्यानुसार धुळे जिल्हा शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 4 शे 20 शाळा सुरू होणार आहेत.