वर्धा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ७ युवकांचा मृत्यू.

At least 7 medical students died in the accident; Prez, VP, PM express grief over a road accident.

वर्धा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ७ युवकांचा मृत्यू, प्रधानमंत्र्यांकडून कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर.

वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातल्या सेलसुरा इथं काल मध्यरात्री झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सावंगी वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल

At least 7 medical students died in the accident
Image by Newsonair.gov.in

कॉलेजच्याएमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वर्धा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत.

चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीवरच्या पुलावरून जवळपास ४० फूट खोल कोसळल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.   

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या रस्ते अपघातात वैद्यकीय संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी महाराष्ट्रातील सेलसुरा येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या सांत्वना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेलसुराजवळ झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *