महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिका-यांना‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर.

Seven fire officers from Maharashtra were awarded the ‘Fire Service Medal’.

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिका-यांना‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर.

नवी दिल्ली : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीरFIRE BRIGADE LONG SERVICE MEDAL FULL झाले आहेत.

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण ४२ अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशम सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बाळू देशमुख यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’

अग्निशमन दलातले फायरमन बाळू देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे. २ वर्षापूर्वी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला होता. पुणे महापालिकेतले मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे.  तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना जाहीर झालं आहे.

राज्याला पाच ‘अग्निशमन सेवा पदक

उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.यात मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर,अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.

देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये १ ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, शौर्यासाठी २ ‘अग्निशमन सेवा पदक’, विशिष्ट सेवेसाठी ९ ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ आणि उत्कृष्ट सेवेसाठी ३० ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *