डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १५० करण्यास परवानगी.

Permission to increase the admission capacity of Dr Punjabrao Deshmukh Smriti Medical College to 150.

डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १५० करण्यास परवानगी.

मुंबई : अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिकMaharashtra Govt वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील.

सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन,  उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *