सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन.

Well, known author and social worker Dr Anil Avchat dies in Pune.

सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन.

पुणे : सुप्रसिद्ध लेखक आणि  समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्याWell known author and social worker Dr. Anil Avchat dies in Pune अशा दुर्लक्षित घटकांच्या  प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं आहे. डॉ. अनिल अवचट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. इथे वापरली जाणारी व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत ही जगभरातल्या  अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली असून राज्य आणि देशपातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंतिम संस्कार केले .

समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली.
आज आपल्यातून  सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व निघून गेलं आहे, हे  क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  अवचटांचं चौफेर लेखन आणि सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचं  हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्त्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे.
त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतिशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी  श्रध्दांजली वाहिली आहे.
“ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतिशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *