प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि मध्य आशियायी देशांची शिखर परिषद संपन्न.

Summit of India and Central Asian countries held in the presence of Prime Minister Narendra Modi.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि मध्य आशियायी देशांची शिखर परिषद संपन्न.

नवी दिल्ली: सर्वसमावेशक आणि स्थिर शेजारी देशांबद्दलच्या भारताच्या संकल्पनेत मध्य आशियाचं स्थान महत्वपूर्ण आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.Summit of India and Central Asian countries held in the presence of Prime Minister Narendra Modi.

ते आज भारत आणि मध्य आशियाई देशांच्या शिखर परिषदेत बोलत होते. प्रादेशिक सुरक्षा आणि अफगाणिस्तानातल्या घडामोडींबाबत सजग राहायच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. त्याची परस्पर सहकार्य महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारत आणि मध्य आशियातले संबध गेल्या तीन दशकांच्या पायावर उभे आहेत, आणि यापुढेही ते वृद्धींगत  होत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतानं आयोजित केलेल्या या परिषदेत कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती सहभागी झाले आहेत. सर्व देशांच्या नेत्यांनी परस्परांमधली भागिदारी अधिक दृढ करण्यासाठीची वचनबद्धता व्यक्त केली अशी माहिती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या सचिव रीनत संधु यांनी बातमीदारांशी बोलतांना दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *