World Health Organization urges Britain not to relax sanctions.
जागतिक आरोग्य संघटनेचं ब्रिटनला निर्बंध शिथिल न करण्याचं आवाहन.
जेनेव्हा : एकीकडे जगभर कोरोना विषाणूमुळे चिंतेचं वातावरण असताना, ब्रिटनमध्ये मास्क वापरण्यासहित कोरोनाचे इतर सुरक्षा नियम शिथिल करण्यात आले आहेत.
नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या वर्धित मात्रा दिल्यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असल्याचं आढळून आल्यामुळे, ब्रिटन सरकाने हा निर्णय घेतला आहे.
कोविड-19 ला फ्लू आजारासमान मानून, इथून पुढे त्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचं ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र कोविड-19 ला ‘फ्लू’ सारखा आजार घोषित करण्यावर आक्षेप नोंदवला असून, त्याचे संभाव्य परिणाम अतिशय धोकादायक ठरू शकतात, असा इशारा दिला आहे.
कोविड सुरक्षा निर्बंध हटवू नयेत, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.