The contribution of Rashtriya Chhatra Sena students is important for realizing the vision of India till the year 2 thousand 47 – Prime Minister.
२ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानांना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण – प्रधानमंत्री.
नवी दिल्ली: २ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानाना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेना प्रधानमंत्री सभेला संबोधित करत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. ही सभा म्हणजे एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सांगता असते आणि दरवर्षी २८ जानेवारीलाच हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मानवंदना स्वीकारली.
एनसीसीच्या छात्रांचे संचलन आणि विविध कसरतींची पाहणी देखील त्यांनी केली. सर्वोत्तम छात्राला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पदकही प्रदान केलं जाणार आहे. १७ राज्यातल्या छात्रांनी या संचलनात सहभागी झाले आहेत. जवळपास १ हजार छात्रांनी साहसी कृत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावर्षीचा प्रधानमंत्री ध्वज महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीनं पटकावला. महाराष्ट्रातल्या सार्जंट किर्ती सिंग, वॉरन्ट पृथ्वी पाटील, सिनिअर अन्डर ऑफिसर निकिता खोत यांना उत्कृष्ट छात्राचं पदक प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलं. सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव यांनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रधानमंत्री ध्वज स्विकारला.