भारतीय नौदल आणि इंडिया इन्फोलाइन होम फायनान्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

MOU Between Indian Navy & India Infoline Home Finance Ltd.

भारतीय नौदल आणि इंडिया इन्फोलाइन होम फायनान्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार.

नवी दिल्ली : इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सी  (आयएनपीए ) आणि आयआयएफएल  होम फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल  एचएफएल ) यांच्यात  27 जानेवारी 22 रोजी एक सामंजस्य करार झाला.MOU Between Indian Navy & India Infoline Home Finance Ltd.

निवृत्त नौदल सैनिकांची भर्ती करण्याच्या दृष्टीने ,संस्थेतील विविध कामांसाठी  सक्षम असलेले निवृत्त सैनिक/माजी सैनिक/त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना आयआयएफएल  एचएफएल मध्ये  संधी प्रदान करण्याचा, या दोन्ही संस्था प्रयत्न करतील. भारतीय नौदलाचे कंट्रोलर ऑफ पर्सोनेल सर्व्हिसेसचे व्हाइस ॲडमिरल सूरज बेरी, आणि आयआयएफएल  एचएफएलचे कार्यकारी संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी मोनू रात्रा  यांनी  या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

निवृत्त सैनिक व्यवहार विभागाचे प्रधान संचालक कमोडोर पंकज शर्मा आणि नौदल मुख्यालयातील निवृत्त सैनिक व्यवहार विभागाचे कमांडर विजय कुमार यांनी इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सीचे प्रतिनिधित्व केले. तर आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडचे प्रतिनिधित्व, आयआयएफएल  एचएफएलचे मुख्य विक्री आणि व्यवसाय विकास  (गणवेशधारी दल ) चे  कर्नल राजेश शुक्ला (निवृत्त), आणि मनुष्यबळ विभाग प्रमुख रश्मी प्रिया यांनी केले.

या सामंजस्य कराराद्वारे, इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सी ही आयआयएफएल एचएफएलच्या मानकांनुसार संबंधित कार्यासाठी  माजी सैनिक/त्यांच्यावर अवलंबून असलेल्या उमेदवारांची निवड करेल.  कंपनी, या बदल्यात, अंतर्गत समावेशन  आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे या व्यक्तींचे कॉर्पोरेट क्षेत्रात स्थानांतर करेल.

आयआयएफएल एचएफएलचा त्यांच्या विविधता  समावेशन उपक्रमाच्या अंतर्गत माजी सैनिकांना त्यांच्या सेवा कालावधीत प्राप्त केलेल्या पात्रता, अनुभव आणि विशेष कौशल्याच्या  अनुषंगाने संधी प्रदान करण्याचे या  उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

देशसेवा पूर्ण केल्यानंतर माजी सैनिकांना  रोजगाराच्या संधी शोधण्यात मदत करण्यासाठी इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सीच्या  प्रयत्नांची  प्रशंसा करत, मोनू रात्रा यांनी देश आणि देशातील  प्रतिभेबद्दल असणाऱ्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ”आयआयएफएल एचएफएलच्या त्यांच्या कार्यक्रमांद्बारे समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी समर्पित असल्याचे सांगे त्यांनी  खरोखर प्रत्येकासाठी चांगले कार्य करत, परवडणारी घरे उपलब्ध करून देऊन आमची विद्यमान कर्मचारी संख्या वाढेल” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयआयएफएल  एचएफएलच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख रश्मी प्रिया म्हणाल्या की, “निःस्वार्थपणे देशाची सेवा करणार्‍या आणि निकोप जगाच्या निर्मितीसाठी लागू पडतील अशी विशेष कौशल्य सोबत घेऊन आलेल्या  आपल्या माजी सैनिकांची भर्ती करण्यासाठी, आम्ही भारतीय नौदलाबरोबर केलेल्या भागीदारीचा  आम्हाला सन्मान आणि अभिमान आहे  आणि या सामंजस्य कराराद्वारे आम्ही  आपल्या सशस्त्र दलांप्रती असलेली आमची वचनबद्धता पुढे नेण्याची आणि आपल्या निवृत्त सैनिकांना  त्यांची कौशल्ये आणि क्षमतेचा वापर सुरु ठेवण्यासाठी  एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आशा व्यक्त करते.

असे आपल्या समारोपीय भाषणात व्हाईस ॲडमिरल सूरज बेरी यांनी सांगितले की, “आपल्या माजी सैनिकांना, निवृत्त सैनिकांना त्यांनी केलेल्या देशसेवेनंतर  त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सी  वचनबद्ध आहे.यासंदर्भात कार्यक्रम निश्चित आणि विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रासोबत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही या उपक्रमावर आयआयएफएल  एचएफएलसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *