Compared to the tests in Pune, the proportion of corona is more than 40%.
पुण्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे प्रमाण ४० टक्क्यांच्या पुढे.
पुणे : पुण्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचं प्रमाण ४० टक्क्यांच्या पुढे गेल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पुण्याव्यतिरिक्त नागपूर आणि नाशिकमध्ये कोरोना बाधितांच प्रमाण हे अनुक्रमे ४४ आणि ४१ टक्क्यांवर पोहोचलं आहे.
पुण्यात आजघडीला कोरोना बाधितांच प्रमाण अधिक आढळून आलं असलं तरीही, तुलनेत रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मात्र ६ टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी खाटांची उपलब्धता आहे.
दिवसेंदिवस कोरोना सुरक्षा निर्बंध कमी केलं जात असून, रुग्णसंख्या वाढत चालली आहे. हे प्रमाण असंच वाढत गेलं,तर मात्र प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं सूचित करण्यात येत आहे.