Yesterday all 110 Omicron affected in the state, from Pune district.
राज्यात कालचे सर्व ११० ओमिक्रॉनबाधित, पुणे जिल्ह्यातले.
पुणे : राज्यात काल ११० ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व बाधित केवळ पुणे मनपा क्षेत्रात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पुणे वगळता इतर कुठल्याही जिल्ह्यात काल एकाही ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली नाही.
राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांची एकंदर संख्या ३ हजार ४० झाली आहे. यापैकी १३७१ रुग्ण हे पुणे ग्रामीण, पुणे मनपा आणि पिंपरी-चिंचवडमधील आहेत.