Launched ‘Digital Parliament App’ to make Lok Sabha digital format more comprehensive.
लोकसभेचे डिजिटल स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी ‘डिजिटल संसद अँप सुरु.
नवी दिल्ली : लोकसभेचं डिजिटल स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी आणि नागरिकांना संसदेसोबत जोडण्याकरिता ‘डिजिटल संसद अँप ‘ सुरु करण्यात आलं आहे.
हे अँप देशाच्या नागरिकांना सर्व संसदीय कामकाज आणि इतर कार्यांविषयी माहिती देत राहील असं लोकसभेच्या सचिवालयानं सांगितलं आहे. संसद सदस्यांविषयी माहिती, त्यांचा अधिवेशनातील सहभाग, १९४७ पासूनची अर्थसंकल्पीय भाषणे आणि १२ ते १७ व्या लोकसभेच्या कामकाजाविषयीची माहिती या अँप द्वारे मिळणार आहे.
विशेष म्हणजे संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण देखील नागरिकांना या अँप द्वारे पाहता येणार आहे. संसदेच्या आभासी दौर्यामखेरीज, यावर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर उपलब्ध होणार आहे.