२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे पावणे ८ हजार अपात्र उमेदवारांना गैरमार्गानं ठरवण्यात आलं पात्र.

In the TET examination held in 2020, about 8000 ineligible candidates were declared eligible.

२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे पावणे ८ हजार अपात्र उमेदवारांना गैरमार्गानं ठरवण्यात आलं पात्र.

पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी-२०२० मध्ये सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.Pune Police Commissioner Amitabh Gupta

२०१९-२०२० मध्ये राज्यातल्या १६ हजार ७०५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती. त्या सर्व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. या तपासणीत सात हजार ८८० अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, यांच्यासह जवळपास ३५ जणांना आतपर्यंत अटक करण्यात आली आहे.

अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसंच राज्य शासानाकडे सादर करण्यात येणार असून याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *