राज्यात नागपूर, गडचिरोलीत कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक.

Nagpur, Gadchiroli has the highest positivity rate of corona patients in the state.

राज्यात नागपूर, गडचिरोलीत कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक.Nagpur, Gadchiroli has the highest positivity rate of corona patients in the state.

मुंबई : ज्यात सध्या नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट अर्थात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी चाचणीला दिलेल्या नमुन्यांपैकी सुमारे ४५ टक्के नमुने कोरोना बाधितांचे असल्याचं समोर येत आहे. २१ ते २७ जानेवारी दरम्यानची ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे.

पुण्यात हे प्रमाण ४० टक्के, नाशिक आणि वाशिममध्ये ३८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. औरंगाबाद, वर्धा, अकोला, चंद्रपूर, सांगली, नांदेड, नंदूरबारमध्ये पॉझिटिव्हीटी रेट ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यातल्या ३३ जिल्ह्यांमधला पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

केवळ पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी अर्थात ६ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

या कालावधीतला देशाचा पॉझिटिव्हीटी रेट सव्वा १६ टक्के आहे. राज्यातल्या परभणी, रायगड, बुलडाणा, बीड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर या ९ जिल्ह्यांमधला पॉझिटिव्हिटी रेट हा देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *