राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना देशाची आदरांजली.

On the occasion of Father of the Nation Mahatma Gandhi’s Memorial Day, the country paid homage to him.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना देशाची आदरांजली.

नवी दिल्ली/ मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त आज संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली इथं राजघाटावर गांधीजींच्याOrganizing various educational activities by the Education Department of the State Government on the occasion of Mahatma Gandhi's death anniversary. समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही गांधीजींना पुष्पार्पण करुन आदरांजली वाहीली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख आर हरी कुमार, हवाईदल प्रमुख एयर मार्शल विवेक राम चौधरी यांनीही राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहिली. आज या निमित्त सर्वधर्मिय प्रार्थनासभा आयोजित केली होती.

हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्यानिमित्त आज सकाळी ११ वाजता सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवर गांधीजींना आदरांजली वाहिली. शांतता आणि अहिंसा यांचे अग्रदूत असलेले गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. गांधीजींचं आयुष्य, त्यांच्या अभिनव कल्पना आणि निस्वार्थीपणा मानवतेला प्रेरणा देत राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.

एकत्रित, बंधुभाव नांदणारा, स्वावलंबी, स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भारताच्या उभारणीचा संकल्प प्रत्येकानं करावा, असं आवाहन नायडू यांनी या ट्विटर संदेशात केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त ट्विटरवर दिलेल्या संदेशात गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. गांधीजींच्या विचारांचा आणखी प्रचार-प्रसार करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. हुतात्मा दिनानिमित्त, आपल्या देशाचं धैर्यानं रक्षण करणाऱ्या सर्व थोर व्यक्तींना आपण आदरांजली वाहत असल्याचं मोदी यांनी या संदेशात म्हटलं आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवतानाच महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. बलाढ्य राजवट उलथून टाकली अन् भारतीयांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सुर्योदय झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली लोकशाही आणखी बळकट व्हावी यासाठी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, समता-बंधुता या तत्वज्ञानाचे पदोपदी स्मरण व्हावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मूल्यांचं महत्त्व जगाला समजावून सांगितलं. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजींच्या विचारातच देशाचं, जगाचं, मानवाचं कल्याण सामावलं आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत. त्या विचारांवर चालण्यासाठी आपण पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधींजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *