Veteran singer Lata Mangeshkar’s health improves.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा.
मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी आज ही माहिती दिली.
लतादीदींना लावलेला व्हेंटिलेटरचा आधार दोन दिवसांपूर्वी काढून टाकला आहे,
मात्र काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवलं जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
कोविडचं निदान झाल्यानं गेल्या ८ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.