BARTY will implement the ‘Tree Plantation Fortnight’ program.

BARTY will implement the ‘Tree Plantation Fortnight’ program.

On the occasion of World Environment Day, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune (an autonomous body of the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra) has organized a fortnight of tree planting all over Maharashtra from 5th to 20th June 2021 under the Barti Samtadoot Project.

In view of the increasing prevalence of Covid-19, oxygen depletion, and increasing pollution, it has become important to protect the environment, so large trees like Neem, Wad, Pimpal, Mango, Chinch, etc. will be planted across the state by the envoys. All these trees provide oxygen and shade. 

During this fortnight, prizes will be given at the district, division, and state level to those who plant and nurture as many saplings as possible. On World Environment Day, the target is to plant 5,000 trees. Barty also plans to plant a total of 50,000 trees in a full plantation fortnight. Although Barti’s envoys are trying to balance the environment by planting trees in large numbers in all the talukas of the state through public participation, each person should plant and nurture at least 1 or more trees. Barty is appealing to everyone about that. An appeal has been made through Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) Pune to call 9404999453/9404999452 to participate in the tree-planting program.

बार्टी राबविणार ‘वृक्षारोपण पंधरवडा’ कार्यक्रम. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था  (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) यांच्या विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात दि.5 ते 20 जून 2021 या कालावधीमध्ये बार्टी अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे वृक्षारोपण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव, प्राणवायूची होत असलेली कमतरता आणि वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादूत यांमार्फत कडुलिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच इत्यादी मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून हे सर्व वृक्ष प्राणवायू व सावली देणारे आहेत. 

या पंधरवड्यात, जे समतादूत जास्तीत जास्त रोपे लावतील व त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करतील त्यांना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पारितोषिके दिली जाणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनी, 5 हजार वृक्ष लागवड करण्याचा लक्ष्यांक आहे. तसेच पूर्ण वृक्षारोपण पंधरवड्यात एकूण 50 हजारापर्यंत झाडे लावण्याचा बार्टीचा मानस आहे.  बार्टीचे समतादूत हे लोकसहभागातून राज्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरी प्रत्येक व्यक्तीने किमान 1 किंवा त्यापेक्षा जास्त झाडे लावावीत व त्याचे संगोपन करावे. त्याबाबत बार्टी कडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता  9404999453/9404999452 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *