There is no slackness.
Criteria and Levels for Restrictions in Break the Chain. The local administration will decide on the restrictions as per the criteria.
Restrictions will be lifted in five levels in the state from next Monday. In this regard, the local Disaster Management Authority will decide on relaxation of restrictions by setting criteria and levels. The Break the Chain order issued today is not to remove restrictions but to determine five different levels of restrictions. Based on these levels, the local administration concerned will make the appropriate decision regarding the restrictions for their area. These suggestions are for the administration, the local disaster management authority will decide accordingly. The state government has made it clear that no one should be confused and others should not be confused.
Corona infection is not the same across the state, its intensity is more or less the same. With this in mind, there are five levels of restrictions to break the chain of the virus on the one hand and to see how our economic, social and daily activities will start in a disciplined manner on the other hand. The criteria for determining these levels will be the daily availability of oxygen beds and the weekly positivity rate. The local Disaster Management Authority of the place will make the appropriate decision on the restrictions based on these criteria.
Level 1 – Where positivity rate is less than 5% and oxygen beds are less than 25% full.
Level 2 – Where the positivity rate is less than five per cent and the percentage of filled oxygen beds is between 25 and 40 per cent.
Level 3- The positivity rate will be between five to ten per cent and the occupied oxygen bed will be more than 40 per cent.
Level 4 – Where the positivity rate is between 10 to 20 percent and the oxygen bed is more than 60 percent filled with patients.
Level 5 – where the positivity is more than 20% and more than 75% oxygen bed is occupied by the patients.
Covid infection is still a challenge for us. In order to prevent this, orders have been issued for the purpose of making it known to the general public how appropriately the criteria and levels for restrictions have been set. Local Disaster Management Authorities in different parts of the state will take appropriate decisions regarding restrictions as per these criteria. The state government has made it clear that the citizens should cooperate with the decisions taken by their respective district administrations during this period of Kovid by following the health rules as well as keeping Covid compliant.
Municipalities and districts are separate administrative units . Different districts are divided into different administrative units.
- A) Greater Mumbai Municipal Corporation, Pune Municipal Corporation, Thane Municipal Corporation, Nashik Municipal Corporation, Pimpri-Chinchwad, Aurangabad, Vasai-Virar, Navi Mumbai, Nagpur, Solapur, Kalyan-Dombivali Municipal Corporation will be considered as separate administrative units.
- B) The remaining area in 34 districts will be treated as a separate administrative unit (excluding Mumbai city and Mumbai suburban district).
- C) The District Disaster Management Administration may send a proposal to declare a place with a population of more than one million as a separate administrative unit. The final decision will have to be sent to the Chief Executive Officer of the State Disaster Management Authority for administrative approval.
Five levels have been created for the areas to be included in different categories for the state. The implementation of these levels will depend on the weekly positivity rate of the place and the daily percentage of oxygen beds filled by the patient. Each disaster management administration will raise restrictions based on these levels in its jurisdiction.
- General Guidelines: –
- Regular super spreaders for the first level, who travel by local train, or the wedding crowd.
- Minimum attendance in crowded places for Level 2, prohibition of gathering in groups in public places, and minimum for daily / weekend traffic after 5 pm for Level 3.
- Complete ban on any movement or movement for Level 4 after 5pm as well as on weekends and during the week. Allowed only for necessary and emergency reasons
- In the fifth level, only emergency and necessary reasons are allowed to come and go.
सरसकट शिथिलता नाही.
ब्रेक दि चेनमधील निर्बंधांसाठी निकष आणि पातळ्या निश्चित. स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधाबाबत निर्णय घेणार.
राज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार आहेत. ह्या बाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निकष आणि पातळ्या निश्चित करून निर्बंधांवर शिथिलता आणण्या बाबत निर्णय घेतील . ब्रेक दि चेनचे आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटवण्यासाठी नसून निर्बंधाबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे संबंधित स्थानिक प्रशासन आपल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.या सूचना प्रशासनासाठी आहेत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याप्रमाणे निर्णय घेईल. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे. हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्ध रित्या सुरु कसे होतील हे पाहणे, एवढ्याच करीता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेड्सची दैनंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील.. त्या त्या ठिकाणाचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.
स्तर १– ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.
स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.
स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.
स्तर ५- जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.
कोविडचा संसर्ग हे आपल्यासाठी अजूनही आव्हान आहे. त्याला रोखण्यासाठी आपण कशा सुयोग्य पद्धतीने निर्बंधांसाठी निकष आखले आहेत व पातळ्या ठरविल्या आहेत त्याची माहिती सर्वसामान्यांना असावी या हेतूने आदेश काढण्यात आले आहेत . राज्यातील वेगवेगळ्या भागातील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषाप्रमाणे निर्बंधाबाबत योग्य तो निर्णय घेतील. नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
पालिका व जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय घटक वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहे.
अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल.
ब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)
क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.निर्बंधांचे स्तर.
राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
- साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-
- पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.
- स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध,
- तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.
- स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचालीवर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा
- पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी. https://mahasamvad.in/?p=40887