More than double the number of newly recovered patients of Kovid 19 in the state yesterday.
राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त.
मुंबई : राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. राज्यात काल १५ हजार १४० नव्या रुग्णांची नोंद झाली, ३५ हजार ४५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ७७ लाख २१ हजार १०९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७३ लाख ६७ हजार २५९ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४२ हजार ६११ रुग्ण दगावले.सध्या राज्यात २ लाख ७ हजार ३५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ४२ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे.
राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ९१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १८ रुग्ण नागपूर, औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबई महानगरपालिका- प्रत्येकी ११, मुंबई आणि ठाणे महापालिका – प्रत्येकी ८, सिंधुदुर्ग आणि सातारा- प्रत्येकी ५, अमरावती, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका- प्रत्येकी ४, तर यवतमाळ आणि पुणे ग्रामीणमधे प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार २२१ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १६८२ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.