Chhatrapati Shivaji Maharaj’s bravery, organizational skills, ideal guide, and inspiration for governance – Deputy Chief Minister Ajit Pawar.
On the occasion of ‘Shivrajyabhishek Dina’, best wishes from Deputy Chief Minister Ajit Pawar.
Chhatrapati Shivaji Maharaj along with the Mavals of the Sahyadri valley established the kingdom of the ryots, the Hindavi Swarajya. He ruled with the justice ‘Praja Sukhi Taranch Raja Sukhi’. The great warrior, skilled administrator, public welfare, prajahitadaksha king created his own identity. Awakened the identity and self-esteem of Maharashtra. He was a visionary king with a thorough study of politics, war strategy, economy, organizational skills, loyalty to human values. Maharaj’s bravery, his prowess, his ideal of governance is unique and his life, work, thoughts will always inspire and guide Maharashtra, said Deputy Chief Minister Ajit Pawar, remembering the work of Chhatrapati Shivaji Maharaj and paid homage to him three times on the occasion of Shiv Rajyabhishek Day. The people of the state have also been given Shivrajyabhishek Day and Shivswarajya Day wishes.
While paying homage to Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion of Shiv Rajyabhishek Day, Deputy Chief Minister Ajit Pawar said that Chhatrapati Shivaji Maharaj is a man of the age. A great man like him is born once in thousands of years. The welfare of all mankind. The work done by Chhatrapati Shivaji Maharaj in his life is supernatural. Maharaj united the Mavals and Athrapagad castes in the valley and planted the seeds of self-respect and self-government in their minds. Shivswarajya was created so that everyone would feel ours and everyone would get justice. Gave justice to the farmers. Gave self-respect to the toilers. The coronation of Shiva gave Maharashtra a welfare king like Chhatrapati Shivaji Maharaj. The coronation day is of utmost importance in the life of all of us because a king like him could see the world.
Let’s pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj, the adored deity of Maharashtra, the founder of Hindavi Swarajya, the hero of farmers, the king of ryots, the epoch-making king, on the occasion of Shiv Rajyabhishek Day. Expressing gratitude and respect for Maharaj, he wished the people of the state a happy Shivrajyabhishek Day and Shiv Swarajya Day.
छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, संघटन कौशल्य, राज्यकारभाराचा आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार.
‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तर राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही स्वत:ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जागृत केला. ते राजनीती, युद्धनीती, अर्थनीती, संघटन कौशल्याचा सखोल अभ्यास असलेले, मानवी मुल्यांवर निष्ठा असलेले दूरदृष्टीचे राजे होते. महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांनी घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श अद्वितीय असून त्यांचे जीवन, कार्य, विचार महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन केलं आहे. राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव हजारो वर्षात एकदा जन्म घेतो. अखिल मानवजातीचं कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेलं कार्य अलौकिक आहे. महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. प्रत्येकाला आपलं वाटेल, सर्वांना न्याय मिळेल असं शिवस्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोककल्याणकारी राजा आपल्याला दिला. त्यांच्यासारखा राजा जगाला पाहता आला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनात सर्वाधिक आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.