देशातली सर्वाधिक स्टार्टअप राज्यात.

The highest startup state in the country.

देशातली सर्वाधिक स्टार्टअप राज्यात.The highest startup state in the country

मुंबई : केंद्र शासनानं नुकत्याच प्रकाशित केलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार ११ हजार ३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र या क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच देशभरात २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्न्स महाराष्ट्रातल्या आहेत.

यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचं मूल्यांकन  साडे सात हजार कोटी ते ७५ हजार कोटी रुपये आहे. या कामगिरीमुळे स्टार्टअप ईकोसिस्टिममधे महाराष्ट्र हे देशातलं अव्वल राज्य ठरलं आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या कल्पक तरुणांनी या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले.

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 30 नोंदणीकृत आणि 9 मान्यताप्राप्त, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 32 नोंदणीकृत आणि 11 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबई महानगर प्रदेशात 14 हजार 710 नोंदणीकृत तर 5 हजार 938 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये 8 हजार 603 नोंदणीकृत तर 3 हजार 375 मान्यताप्राप्त, औरंगाबादमध्ये 774 नोंदणीकृत तर 220 मान्यताप्राप्त, सिंधुदुर्गमध्ये 36 नोंदणीकृत तर 14 मान्यताप्राप्त याप्रमाणे स्टार्टअप आहेत. असं मलिक यांनी सांगितलं.
नीती आयोगानं जाहीर केलेल्या इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्येही महाराष्ट्रानं द्वितीय क्रमांक पटकावला होता, असंही त्यांनी सांगितले. 
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *