सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला साखर संग्रहालय उभारणीचा आढावा.

Co-operation Minister Balasaheb Patil reviewed the construction of Sugar Museum

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला साखर संग्रहालय उभारणीचा आढावा

पुणे : साखर आयुक्तालयात उभारण्यात येणाऱ्या जगाजिक दर्जाच्या साखर संग्राहलय उभारणीबाबत आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेतला.

साखर आयुक्तालय येथे आज झालेल्या आढावा बैठकीला साखर आयुकत शेखर गायकवाड यांच्यासह साखर आयुक्तालयाचे संचालक तसेच वसंतदादा शुगर इंन्सीटयुटचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ऊस उत्पादन, साखर उत्पादन, गुळ, साखरेपासून बनणारे उपपदार्थ याबाबतची माहिती अभ्यागतांना मिळण्यासाठी आणि शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी तसेच अभ्यासकांना माहितीसाठी साखर संग्रहालय उपयुक्तस ठरेल व देशासाठी मानबिंदु ठरेल, असा विश्वास सहकारमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

ऊस गाळप हंगामाचाही आढावा

सहकारमंत्री श्री. पाटील यांनी राज्यातील ऊस गाळप हंगाम 2021-22 चाही आढावा घेतला. यामध्ये एफआरपी, विभागनिहाय तसेच साखर कारखानानिहाय गाळप याबाबतची माहिती घेतली. प्रादेशिक सहसंचालक यांनी आपल्या क्षेत्रातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी राज्यातील सर्व विभागांचे प्रादेशिक सहसंचालक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *