महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – नितीन गडकरी.

Maharashtra’s economy is the fastest-growing economy in the country – Nitin Gadkari.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – नितीन गडकरी.

मुंबई: महाराष्ट्र ही देशाची सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग आणि कृषी संस्था राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिनUnion Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र विकास परिषदेनं आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते.

या संस्थेनं राज्याच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबवावा असं त्यांनी सांगितलं. राज्यात ऊर्जा, पाणी, किनारपट्टी आणि चांगले रस्ते असून यांच्या मदतीने नजीकच्या भविष्यात आपण राज्याचा विकास करू शकतो असं ते म्हणाले. उद्योग, वाणिज्य आणि कृषी राज्याच्या विकासाचा कणा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी विविध क्षेत्र आहेत मात्र राज्याच्या विकास प्रकल्पांबाबत विचार करताना संपूर्ण राज्याचा विचार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या वाहतुकीसाठी जलमार्गांचा वापरासारखे सृजनशील पर्याय असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *