PM’s appeal to citizens to form people’s movement to protect the environment and face climate change.
पर्यावरणाचं संरक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जनआंदोलन उभारण्याचं प्रधानमंत्र्यांचे आवाहन.
हैदराबाद: पर्यावरणाचं संरक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जनआंदोलन उभारावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
हैदराबादच्या पतंनचेरु इथं आंतराराष्ट्रीय अर्धशुष्क उष्ण कटीबंधीय पिक संशोधन संस्थेच्या सुर्वणमहोत्सवी समारंभाचा प्रारंभ काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. रोपांचं संरक्षण आणि जलदउत्पादन उन्नती सुविधेवर आधारित संस्थेच्या हवामान बदल संशोधन केंद्राचं उद्धाटनही त्यांनी यावेळी केलं. संस्थेच्या ५० व्या वर्धापन सोहळ्यानिमित्तानं एक टपाल तिकिटही प्रधानमंत्र्यांनी जारी केलं.
हवामानबदलाच्या समस्येपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी सरकारनं पुढल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नैर्सगिक शेती आणि डिजिटल शेतीवर भर दिल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही वर्षात पामतेलाचं क्षेत्र वाढवून साडेसहा लाख हेक्टवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्टं आहे.
सरकार खाद्य आणि पोषण सुरक्षेवर लक्ष्य केंद्रीत करत आहे, असं ते म्हणाले.प्रधानमंत्र्यांनी आज हैदराबादमध्ये मुंचीताल इथल्या ‘स्टॅचू ऑफ इक्वॅलिटी’चं म्हणजेच ११व्या शतकातल्या भक्ती परंपरेतले संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं राष्ट्रार्पणही केलं. हा पुतळा २१६ उंचीचा आहे. संत रामानुजाचार्य यांनी नेहमीच धर्म, जात आणि वंश यासह जगण्यात प्रत्येक बाबतीत समानता असायला हवी यावर भर दिला होता, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.