Ministry of I&B Order on Revocation of Uplink and Downlink Permission to Media One Channel Upheld by Kerala High Court.
मीडिया वन वाहिनीला अपलिंक आणि डाउनलिंक परवानगी रद्द करण्याबाबतचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाकडून कायम.
नवी दिल्ली : मीडिया वन न्यूज आणि करंट अफेअर्स वाहिनीला अपलिंक आणि डाउनलिंकची परवानगी रद्द करण्याबाबतचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने आज
कायम ठेवला. गृह मंत्रालयाने या वाहिनीला सुरक्षा मंजुरी नाकारल्यानंतर वाहिनीवर निर्बंध घालण्यात आले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाविरुद्ध रिट याचिका फेटाळताना, न्यायालयाने नमूद केले की गृह मंत्रालयाने मंजुरी नाकारणे हे गुप्तचर माहितीवर आधारित होते जे वाहिनीला सुरक्षा मंजुरी नाकारण्याचे समर्थन करते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 रोजी मीडिया वन वाहिनी चालविणाऱ्या मेसर्स माध्यमम ब्रॉडकास्टिंग लिमिटेडला अपलिंक आणि डाउनलिंक परवानगी रद्द करण्याचा आदेश जारी केला होता. परवानगी दिलेल्या वाहिन्यांच्या यादीतून या वाहिनीचे नाव देखील या आदेशाद्वारे काढून टाकण्यात आले आहे.
या वाहिनीला यापूर्वी 30.9.2011 रोजी 29.09.2021 पर्यंतच्या कालावधीसाठी वाहिनी अपलिंक आणि डाउनलिंक करण्याची परवानगी देण्यात आली होती.