पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेची प्रगती.

Progress related to PM Gati Shakti National Master Plan.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेची प्रगती.

नवी दिल्‍ली :  पायाभूत सुविधाविषयक प्रकल्पांचे समन्वयीत नियोजन करण्यासाठी, पायाभूत सुविधांशी तसेच आर्थिक बाबींशी संबंधित मंत्रालयांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेच्या माध्यमातून सुरु होणाऱ्या प्रकल्पांची निश्चिती करण्यात येत आहे. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज ही माहिती दिली.PM Gati Shakti National Master Plan.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेच्या प्रगतीबाबत केंद्रीय मंत्र्यांनी पुढील माहिती दिली:-

  1. भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश तंत्रज्ञान आणि भू-माहिती संस्थेने उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय महायोजना पोर्टलसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांच्याकडून माहितीचे एकत्रीकरण करत आहेत. राज्यांशी संबंधित माहितीसाठी राज्य सरकारांशी समन्वय साधून माहितीचे एकत्रीकरण करण्यात येत आहे.
  2. सचिवांचा सक्षम गट, संपर्क नियोजन गट आणि तंत्रज्ञान विषयक पथक यांची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आले आहे.
  3. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेशी संबंधित 17 केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांच्यासाठी प्रशिक्षण तसेच क्षमता निर्मिती कार्यक्रम पूर्ण करण्यात आले आहेत आणि प्रादेशिक स्तरावरील पाच परिषदांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

यासंबंधी अधिक तपशीलवार माहिती देताना केंद्रिय मंत्री म्हणाले की, पुरविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, समक्रमित नियोजन आणि अंमलबजावणीसाठी हे प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. सचिवांचा सक्षम गट, संपर्क नियोजन गट या दोन गटांची स्थापना करून विविध मंत्रालये आणि विभाग यांचे समायोजन करण्यात आले आहे. सचिवांच्या सक्षम गटाच्या माध्यमातून 18 मंत्रालये आणि विभाग यांचे समायोजन करण्यात आले आहे. या गटाच्या पहिल्या बैठकीनंतर नीती आयोग, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच वाणिज्य विभाग या चार मंत्रालये आणि विभागांनी देखील सचिवांच्या सक्षम गटाचा भाग होण्यास सह-मान्यता दिली आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, संपर्क नियोजन गटामध्ये रेल्वे मंत्रालय, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, उर्जा, नवीन तसेच नूतनीकरणीय मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच दळणवळण विभागाचा समावेश आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *