More than 6 crore beneficiaries in the age group of 15-18 years have been vaccinated against corona.
देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस.
नवी दिल्ली : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी १५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ५२ लाख पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ६ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. आज सकाळपासून देशभरात सुमारे ३२ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
राज्यात आज सकाळपासून सुमारे २ लाख ५२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १५ कोटी ८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ६ कोटी २९ लाख ३८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर ११ लाख ८३ हजारापेक्षा पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ३८ लाख ५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.