ग्रामीण विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एस टी) संपाचा फटका.

State Transport (MSRTC) strike hits rural students.

ग्रामीण विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एस टी) संपाचा फटका.

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याची आकडेवारी समोर येताच पुणे शहर आणि जिल्ह्यातील १ली ते ८वीच्या शाळा पुन्हा पूर्ण वेळ सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला पण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्याState-Transport MSRTC बसगाड्या आणि अन्य वाहने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसल्यानं विद्यार्थी मात्र शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नसल्याचं चित्र आज दिसत आहे.

बऱ्याच शाळांमधून अजूनपर्यंत वाहतूक व्यवस्थेबद्दलचे कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळं शहरात बसगाड्या बंद आहेत तर अनेकांची वाहने नादुरुस्त अवस्थेतच आहेत . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस टी संपाचा फटका बसला असून त्यामुळं इच्छा असूनही शाळेपर्यंत पोचता येत नाही ही त्यांची खंत आहे.

एकंदरीत शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय केवळ कागदोपत्रीच दिसून आला असून विद्यार्थ्यांना मात्र अजूनही त्याचा लाभ मिळालेला नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *