कोरोना काळातही प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळली – केंद्रीय अर्थमंत्री.

Even during the Corona pandemic, the government led by the Prime Minister managed the country’s economy efficiently – Union Finance Minister.

कोरोना काळातही प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळली – केंद्रीय अर्थमंत्री.

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला संकटात टाकलेल्या कोरोना महामारीच्या काळातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळली असं केंद्रीय अर्थमंत्रीUnion Finance Minister Nirmala Sitharaman in Parliament निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत २०२२-२३ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होत्या.

२००८-०९ साली आलेल्या जागतिक मंदीच्या तुलनेत कोविड काळातलं भारताचं आर्थिक नुकसान मोठं होतं, विकासदरही उणे ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावर गेला, मात्र जागतिक मंदीच्या काळात भारताचा ग्राहक मूल्य निर्देशांक ९ पूर्णांक १ दशांश टक्क्यावर पोचला होता, त्या तुलनेत कोविडच्या संकटातही भारताचा ग्राहक मूल्य निर्देशांक केवळ ६ पूर्णांक २ दशांश टक्क्यापर्यंत मर्यादित राहीला असं त्यांनी सभागृहाला सांगितलं.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात महागाईचा दर दोन अंकी होता, हा देशाचा अंध काळ होता. मात्र पुढची २५ वर्षे म्हणजे देशाचा अमृत काळ आहे असं त्या म्हणाल्या.

जागतिक आर्थिक मंदीच्या काळातच, भारताचा परकीय चलन साठा २५२ अब्ज अमेरिकी डॉलर्स होता, तर थेट परकीय गुंतवणूक ८३० कोटी डॉलर्स होती, त्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात परकीय चलनसाठा ५७९ अब्ज डॉलर्स आणि थेट परकीय गुंतवणूक ८ हजार १० कोटी डॉलर्सपर्यंत वाढली असं त्यांनी सांगितलं.

चालू वर्षात देशाचा विकासदर ९ टक्के, तर २०२३ या वर्षात ७ पूर्णांक १ दशांश टक्के राहील असं त्यांनी सांगितलं. आगामी काळात भारत ही जगातली वेगानं वाटचाल करणारी अर्थव्यवस्था असेल असं त्या म्हणाल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मागणीवर आधारीत चालणारी योजना आहे, आणि जेव्हा जेव्हा मागणी वाढेल तेव्हा तेव्हा या योजनेसाठी अधिक निधी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *