अमेरिकी नौदलाच्या शिष्टमंडळाची मुंबईतील पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयाला भेट

US Navy Delegation visits HQWNC at Mumbai

अमेरिकी नौदलाच्या शिष्टमंडळाची मुंबईतील पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयाला भेट

मुंबई : अमेरिकी नौदलाच्या दहा सदस्यीय शिष्टमंडळाने 9 फेब्रुवारी 2022 रोजी देशाच्या पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. अमेरिकेच्या कमांडर पाणबुडी चमूचेUS Navy Delegation visits HQWNC at Mumbai रिअर ॲडमिरल लिओनार्ड सी बच दोलागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. मुंबईतील अमेरिकी दूतावासाचे काऊंसेल जनरल डेविड रांझ यावेळी उपस्थित होते.

या दौऱ्यात रिअर ॲडमिरल दोलागा यांनी नौदलाच्या पश्चिमी कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग-PVSM, AVSM, VSM, ADC, यांची भेट घेतली. सागरी क्षेत्राच्या संदर्भात महत्त्वाच्या मुद्यांवर तसेच उभय देशांच्या नौदलांच्या वाढत्या सहकार्याबद्दल यावेळी चर्चा झाली.

ऑक्टोबर 2020 मध्ये उभय देशांदरम्यान झालेल्या BECA – पायाभूत आदानप्रदान आणि सहकार्य करारानुसार होणाऱ्या कार्यक्रमांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने अमेरिकी नौदलाच्या शिष्टमंडळाचा हा दौरा आखण्यात आला होता. UDA अर्थात जलमग्न क्षेत्रविषयक जागृती यासंदर्भात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी BECA मध्ये सहमती झाली होती.

‘UDA च्या अत्यंत उपयुक्त अशा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे तसेच भारत-अमेरिका समग्र जागतिक सामरिक भागीदारी दृढ करण्याचे मार्ग’- याविषयी अमेरिकी नौदलाच्या शिष्टमंडळाने एक सादरीकरण केले. भारताकडून या चर्चेचे नेतृत्व, HQWNC चे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी केले. UDA मध्ये परस्पर सहकार्य करण्याचे अनेक पैलू यावेळी चर्चिले गेले.

जून 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी भारताला ‘महत्त्वपूर्ण संरक्षण भागीदार दर्जा’ अमेरिकेने बहाल केला होता. यानुसार संरक्षण क्षेत्रात भारताबरोबर व्यापार आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण अमेरिकेच्या इतर सर्वात निकटच्या मित्रराष्ट्रांच्या बरोबरीने होणार आहे. वर्ष 2014 पासून उभय देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या महत्त्वाच्या करारांमध्ये- संरक्षण आराखडा करार (DFA), BECA, लष्करी माहितीच्या सर्वसामान्य सुरक्षेविषयक करार, संवाद सुसंगतता आणि सुरक्षा व्यवस्था, लॉजिस्टिक्स आदानप्रदान सामंजस्य करार, हे करार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *