व्यवस्थापन क्षेत्रात अनेक नव्या संधी उपलब्ध होणार

Many new opportunities will be available in the field of management

व्यवस्थापन क्षेत्रात अनेक नव्या संधी उपलब्ध होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेसोबत सामंजस्य करार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रम, नवोपक्रम, स्टार्टअप अशा अनेक संधीSavitribai Phule Pune University विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. या करारानुसार पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर मंगळवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, इनोव्हेशन सेलच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, कुलसचिव व्ही सुधीर, ए. के.तिवारी आदी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात नवे उद्योजक निर्माण करण्याच्या हेतूने उद्योग नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना माफक शुल्कात अनेक नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होऊ शकतील. सहकार विषयात नवीन स्टार्टअप तयार होण्यास मदत होईल असे डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *