१७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ मे ते ४ जून या कालावधीत होणार

The 17th Mumbai International Film Festival will be held from May 29 to June 4

१७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ मे ते ४ जून या कालावधीत होणार

मुंबई: १७ व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन २९ मे ते ४ जून या कालावधीत करण्यात आलं आहे. मुंबईतल्या फिल्मस डिव्हिजन संकुलात हा महोत्सव होणार  आहे. माहितीपट,  लघुपट आणिThe 17th Mumbai International Film Festival अॅनिमेशन या चित्रपटांसाठी हा महोत्सव प्रसिद्ध आहे.

चित्रपटांसाठीच्या ऑनलाइन प्रवेशिका येत्या मंगळवारपासून १५ मार्चपर्यंत स्वीकारल्या जातील. विविध स्पर्धा श्रेणींमध्ये चित्रपट प्रविष्ठ करण्यासाठी चित्रपट निर्माते www.miff.in अथवा to https://filmfreeway.com/MumbaiInternationalFilmFestival-MIFF या संकेत स्थळावर लॉग इन करू शकतात.

१ सप्टेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ महोत्सवासाठी पात्र ठरणार आहेत. सर्वोत्कृष्ट माहितीपटाला  सुवर्णशंख  आणि  १० लाख रुपये रोख देण्यात येणार आहेत.

विविध श्रेणीमध्ये विजेत्या चित्रपटांना रोख रक्कम, रौप्य शंख , स्मृतीचिन्ह  आणि प्रमाणपत्र दिली  जाणार आहेत  देश यंदा आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असल्यामुळे, महोत्सवात India@75 या संकल्पनेवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे.

या महोत्सवात भारतातील नॉन फिचर फिल्म क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा १० लाख रुपये रोख, स्मरणचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रतिष्ठित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान केला जाईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *