The Finance Minister informed that no concrete decision has been taken regarding the introduction of digital currency
डिजिटल चलन सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय झाला नसल्याचं अर्थमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : देशात डिजिटल चलन लागू करण्याबाबत असून ठोस निर्णय झाला नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
अर्थसंकल्पानंतर आज त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
बँकांच्या समस्यांवर सरकारनं वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे बँकांची कार्यक्षमता वाढून विश्वासार्हतेत सुधारणा झाली आहे, असं सितारामन यांनी सांगितलं. बँकांच्या थकित मालमत्तेतही घट झाल्याचं त्या म्हणाल्या.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चलनवाढीचा दर ४ पूर्णांक ५ शतांश टक्के होता. दुसऱ्या तिमाहीत ५ पूर्णांक, तर तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत दर ४ आणि ४ पूर्णांक २ शतांश टक्के राहण्याचा अंदाज आहे.