RJD chief Lalu Prasad Yadav convicted by Special CBI Court in fodder scam case at Ranchi; Quantum of punishment to be pronounced on Feb 21
चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी एका खटल्यात लालू प्रसाद यादव दोषी
नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या अंतिम प्रकरणात रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण झारखंडमधील डोरंडा ट्रेझरीमधून एकशे 39 कोटींहून अधिक रक्कम फसवणुकीने काढून घेण्याशी संबंधित आहे.
विशेष न्यायालयाने 24 अन्य आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. न्यायालय 21 फेब्रुवारी रोजी आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. न्यायालयाने RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांना होटवार तुरुंगात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
चारा घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसके शशी यांनी लालू यादव आणि अन्य ९९ आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. चारा घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या वकिलांनी आकाशवाणीला सांगितले की लालू प्रसाद यादव यांना २१ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित पाचपैकी चार प्रकरणांमध्ये लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. झारखंडच्या स्थापनेपूर्वी लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना चाईबासा, देवघर आणि दुमका कोषागारातून निधी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चार प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो- सीबीआयने चारा घोटाळ्याच्या संदर्भात 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत 565 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दरम्यान, सीबीआयला आजपर्यंत सहा आरोपींचा शोध लावता आला नाही आणि या काळात 55 आरोपींचा मृत्यू झाला.