बनावट पावत्यांच्या माध्यमातून सुमारे 21 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे रॅकेट उघडकीस

CGST Commissionerate, Navi Mumbai busts fake Input Tax Credit racket of about Rs. 21 crores

नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने बनावट पावत्यांच्या माध्यमातून सुमारे 21 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे रॅकेट उघडकीस आणले

मुंबई :  नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने  सुमारे 21 कोटी रुपये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे  रॅकेट उघडकीस आणले आहे आणि मेसर्स  श्री रामएंटरप्राइज (GSTIN:Goods & Service Tax 27FPAPS4153A1Z3) च्या मालकाला आज अटक केली. ही कंपनी सुमारे 100 कोटी रुपयांच्या बनावट  इनव्हॉइसवर फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, वापरणे आणि दुसऱ्याला देण्याचे व्यवहार करतहोती.

सीजीएसटी नवी मुंबईच्या कर चुकवेगिरी विरोधी पथकाने या कंपनीची चौकशी केली. मालकाने दिलेल्या जबाबानुसार, ही कंपनी विविध धातूंच्या भंगाराच्या व्यापारात सहभागी आहे. तपासात असे आढळून आले की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट आयटीसीचा लाभ घेतला आणि दुसऱ्याला हस्तांतरित केला. आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा, 2017च्या कलम 69 (1) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) आणि (c) नुसार गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्याला बेलापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर 16.02.2022 रोजी हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे प्रकरण सीजीएसटी  मुंबई विभागाने  फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग आहे जे नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी स्पर्धा निर्माण करतात आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करतात. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने अलिकडेच सुमारे 500 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली,  20 कोटी रुपये जप्त केले आणि  13 जणांना अटक केली.

सीजीएसटी विभाग कर चुकवणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, सीजीएसटी मुंबई विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या पाच महिन्यांत 625 हून अधिक कर चुकवेगिरीचे गुन्हे  नोंदवले  असून 5500  कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधून काढली आहे, तर  630 कोटी रुपये वसूल केले असून 50हून अधिक लोकांना अटक केली आहे.

फसवणूक  आणि करचोरी करून सरकारला फसवणाऱ्यांविरोधात सीजीएसटी विभागमोहीम अधिक तीव्र करणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *