PM Modi and Crown Prince of Abu Dhabi to hold Virtual Summit today
प्रधानमंत्री आणि अबुधाबीचे राजपुत्र आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संयुक्त अरब अमिरातीच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट होणार आहे.
यावेळी दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्यावर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. अलिकडच्या काळात भारत आणि संयुक्त अरब अमिराती मधील द्विपक्षीय संबंध सर्व क्षेत्रात मजबूत झाले असून, दोन्ही देशांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015, 2018 आणि 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली तर अबुधाबीचे राजपुत्र 2016 आणि 2017 मध्ये भारत भेटीवर आले होते. दोन्ही देशांमधील मंत्रीस्तरीय भेटी देखील सुरू असून, परराष्ट्र मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांच्या भेटींचा समावेश आहे.