ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

Apart from Vehloli in the Thane district, no bird flu has been reported anywhere else

ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले

Chicken being tested for Bird Flu
Image by
commons.wikimedia.org

असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

      या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले कीमौजे वेहळोलीता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल  प्राप्त झाला. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून  बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून 1 कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पोल्ट्री फार्म मधील कुक्कुट पक्षीउर्वरित पक्षी खाद्यअंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने प्रभावित पक्ष्यांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही. तोपर्यंत या 1 कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावेअसे निर्देश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. 

      वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नयेअसे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *