Indian Naval Sailing Vessels(INSVs) In President’s Fleet Review 2022
‘प्रेसिडेंट फ्लीट रिव्यू’ 2022 साठी भारतीय नौदलाची जहाजे (INSVs) दाखल
नवी दिल्ली : प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू 2022 (PFR 2022) च्या नौदल संचलन उपक्रमांचा एक भाग म्हणून, महासागरात जाणाऱ्या भारतीय नौदलाची सहा जहाजे (INSVs) म्हादेई, तारिणी, बुलबुल, हरियाल, कडलपुरा आणि नीलकंठ गोव्याहून विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहेत. हीसर्व सहा जहाजे दक्षिणी नौदल कमांडच्या अंतर्गत गोव्यातील आयएनएस मांडवी येथे महासागर ‘सेलिंग नोड’चा भाग आहेत. नौदल, एएनसी आणि संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (नौदल ) च्या तीन कमांडमधील प्रत्येकी सहा नौदल अधिकारी चालवत आहेत. या पथकामध्ये सहा महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
या मोहिमेची सुरुवात 12 जानेवारी 22 रोजी गोव्यातून झाली. गोवा ते विशाखापट्टणम हा 1600 सागरी मैलाचा प्रवास (जवळजवळ 3000 KM), संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय स्थित इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशन (INSA) च्या नेतृत्वाखाली पार पडला.
या नौका भारतीय नौदलाद्वारे सागरी नौकानयनासाठी वापरल्या जातात. समुद्रातील नौकानयनाचा पुरेसा अनुभव असलेल्या स्वयंसेवकांमधून सागरी सफरीसाठी चालक दलाची निवड केली जाते. सागरी नौकानयन हा अत्यंत कठीण साहसी क्रीडा प्रकार आहे. भारतीय नौदल सागरी नौकेचा वापर साहसाची भावना जागृत करण्यासाठी, जोखीम घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी नौकानयनशास्त्र, दळणवळण, इंजिन आणि ऑनबोर्ड यंत्रसामग्रीचे तांत्रिक परिचालन, इनमारसॅट उपकरणांचे ऑपरेशन, लॉजिस्टिक नियोजन इत्यादींसह आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी करते. यामुळे सागर परिक्रमा आणि केपटाऊन ते रिओ डी जनेरियो शर्यती,IONS नौकानयन मोहीमेसारख्या नौकानयन मोहिमांमध्ये भाग घेऊन जगभरात आपले अस्तित्व दाखवण्याची भारतीय नौदलाची क्षमता देखील वाढते.
यापूर्वी, म्हादेईने 2010 मध्ये कॅप्टन दिलीप दोंदे आणि 2013 मध्ये कमांडर अभिलाष टॉमी यांच्यासोबत ‘सागर परिक्रमा’ केली आहे. म्हादेईने 2011, 2014 आणि 2017 मध्ये केपटाऊन ते रिओ दी जानेरो शर्यतीत देखील भाग घेतला होता.
तारिणीने 2017 मध्ये सर्व महिला अधिकारी दलासह ‘नाविका सागर परिक्रमा’ ही जगाची परिक्रमा केली आहे.
मार्च अखेरपर्यंत नौदलाची जहाजे गोव्यात परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे.