Inauguration of Pune Police’s ‘My Pune Safe’ app and ‘Transfer Software’ by hands of Deputy CM Ajit Pawar.
Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune District Ajit Pawar inaugurated the ‘My Pune Safe’ app and transfer software developed by Pune City Police Commissionerate. Police Commissioner Amitabh Gupta, Joint Commissioner of Police Dr Ravindra Shiswe, Additional Commissioner of Police Dr Jalindar Supekar, Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh, Swapna Gore, Mitesh Ghatte, Priyanka Naranware, Assistant Commissioner of Police Satish Govekar along with senior officers and other staff of the police force were present on the occasion.
How does the My Pune Safe app work?
The “My Safe Pune” app has been developed for the daily patrol of Bit Marshall from the Police Station at the Pune City Commissionerate, with the concept of providing immediate police services to the citizens of Pune city, as well as at the scene of any incident. With the help of this app, Bit Marshall from the police station records the latitude and longitude and time of the incident if you upload a selfie photo in the My Safe Pune app by visiting important places or visiting the scene of any incident. From the app, the police control room in Pune city gets information about the area where the bit marshal is patrolling. All information about when and where Bit Marshall visited is permanently available in the app. This app has been successfully implemented in the area under the guidance of Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh.
Information about Transfer Software.
With the help of transfer software, the officers and employees of the Pune city police force will get administrative, transparent and like-minded transfers. The app will record the names, designations, tenure, etc. of the police officers and staff. It will help in allocating the same number of police personnel in the police station. Deputy Commissioner of Police Swapna Gore presented the software and gave information about the working procedure.
पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ॲपचे आणि ‘बदली सॉफ्टवेअर’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार.यांच्या हस्ते उद्घाटन.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘माय पुणे सेफ’ ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते .
कसे काम करते माय पुणे सेफ ॲप?
पुणे शहरातील नागरिकांसाठी, तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी, पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर, यांचे संकल्पनेतुन, पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल, यांचे दैनिक गस्तीसाठी “माय सेफ पुणे” ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या सहाय्याने पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध होण्याकरीता, महत्वाचे ठिकाणी भेटी देवून किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देवून त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढुन माय सेफ पुणे ॲपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद होते. ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲप मध्ये उपलब्ध राहते. हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.
असे असेल बदली सॉफ्टवेअर.
बदली सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय, पारदर्शक आणि मनासारखी बदली मिळण्यास मदत होणार आहे. या ॲपमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, त्यांचा कार्यकाळ इत्यादीबाबीची नोंद असणार आहे. पोलीस स्थानकामध्ये समान पोलीस कर्मचाऱ्याचे बदलीने वाटप करण्यास मदत होणार आहे. यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सादरीकरण करुन त्या बद्दलची आणि कार्यपध्दतीबाबतची माहिती दिली.