नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या ४ जणांना गडचिरोलीत अटक

4 arrested for supplying explosives to Naxals in Gadchiroli

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या ४ जणांना गडचिरोलीत अटक

गडचिरोली : विघातक कारवाया करण्यासाठी नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना गडचिरोली जिल्ह्यातल्या भंगारामपेठा गावातून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ हजार ५००4 arrested for supplying explosives to Naxals in Gadchiroli मीटर लांबीचं १० कार्डेक्स वायरचं बंडल जप्त केलं आहे.

राजू गोपाल सल्ला, काशिनाथ ऊर्फ रवी मुल्ला गावडे, साधू लच्चा तलांडी आणि मोहम्मद कासिम शादुल्ला अशी आरोपींची नावे असून, छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे हा पाचवा आरोपी फरार झाला आहे. हे चारही जण तेलंगणा राज्यातून दामरंचामार्गे छत्तीसगडमध्ये कार्डेक्स वायर या स्फोटक साहित्याचा नक्षल्यांना पुरवठा करणार होते.

नक्षलवादी बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी ही स्फोटके तयार करण्यासाठी कार्डेक्स वायरचा वापर करतात. नजीकच्या काही दिवसांत नक्षलवादी या साहित्याद्वारे घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *