लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम

Other restrictions, including local travel, remain in place for non-vaccinated citizens

लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायमMumbai-Local-Train

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात जारी केलेले आदेश राज्यात अदयाप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम असल्याचं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे.

कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी जुलै, आणि ऑगस्ट २०२१ मधे जारी केलेल निर्बंधाचे आदेश रद्द केले आहेत. मात्र  ८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, ८ जानेवारी, ९ जानेवारी आणि ३१ जानेवारी २०२२ या तारखांना जारी केलेले आदेश अदयाप लागू असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *