राज्यातल्या बाराशे विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

State Government’s demand to the Center for the immediate repatriation of twelve hundred students from the state

राज्यातल्या बाराशे विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Higher and Technical Education Minister Uday Samant
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यातले बाराशे विद्यार्थी युक्रेनमधे अडकले असून त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावी अशी मागणी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रधानमंत्री कार्यालय, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.

युक्रेनची राजधानी क्यीव इथून पूर्ण भरलेलं एयर इंडियाचं विमान काल रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.

येत्या 25 आणि 27 फेब्रुवारीला तसंच 6 मार्चला क्यीवहून 4 विमानं दिल्लीसाठी रवाना होतील, असं युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने सांगितलं.

एयर अरेबिया, फ्लाय दुबई, कतर एयरवेज या इतर काही कंपन्याही युक्रेनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांकरता विमान उड्डाणं चालवत आहेत. त्यांच्या संकेतस्थळावरुन, कार्यालयातून, अधिकृत एजंटांकडून किंवा कॉल सेंटरमार्फत त्याची तिकिटं मिळू शकतील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *