युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Chief Minister’s instructions to coordinate with the Center regarding the safety of citizens of Maharashtra stranded in Ukraine

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Chief Minister Uddhav Thackeray.
File Photo

मुंबई  : युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे निर्देश दिले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून  उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *