युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक

PM Modi chairs Cabinet Committee on Security meeting

युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठकPM Narendra Modi

नवी दिल्ली : युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची संध्याकाळी बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या बैठकीला उपस्थित होते.

त्यापूर्वी विद्यार्थ्यांसह युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. जगात शांतता कायम रहावी आणि युद्ध वाढेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भारताची इच्छा असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार सुरक्षाविषयक धोरणांचे उच्चपदस्थ अधिकारी जोसेप बोरेल फाँटेल्स यांच्याशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली.

तसंच ही परिस्थिती निवळण्यासाठी भारत कसं योगदान देऊ शकतो याविषयी चर्चा केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *