Deputy Chief Minister Ajit Pawar distributes suction devices to Gram Panchayats
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना सक्शन यंत्राचे वितरण
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन परिसरात जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रणेचे वितरण करण्यात आले.
श्री.पवार यांनी यंत्राविषयी माहिती घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र देण्याची योजना घेण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला ८ लक्ष ९० हजार याप्रमाणे ११ तालुक्यातील वारुळवाडी, ओतूर, चिंबळी, चऱ्होळी खु., अवसरी बु., निंबुत, भिगवण, अंथुर्णे, निराशिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरळी कांचन, लोणी काळभोर अशा 17 तसेच भोर तालुक्यातील एक याप्रमाणे १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र पुरविण्यात आले आहे. या यंत्राची क्षमता ३ हजार लिटर आहे.