शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींच्या शाळेची जागा बार्टीच्या ताब्यात देण्याचे आदेश

शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींच्या शाळेची जागा बार्टीच्या ताब्यात देण्याचे आदेशDr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

पुणे : येरवडा महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर म्हणून कोरोना बाधित बंद्यांच्या कारागृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली जागा शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शाळा सुरू करण्यात येणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

बार्टी येरवडा संकुलासमोर असलेल्या तसेच एकाच आवारात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोरोना कालावधीत कोविड-19 बाधीत बंद्यांसाठी तात्पुरते कारागृह घोषीत करण्यात आले होते.

आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची शाळा सुरु करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत.

तसेच राष्ट्रीय सफाई कार्मचारी आयोग, नवी दिल्ली यांनी बार्टी संस्थेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी सर्वांगिण विकासाचे प्रशिक्षण सुरु करणे व येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा तात्काळ सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार शाळा सुरु करणे आवश्यक असून शाळेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने व शाळा निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शाळा सुरु करण्यासाठी ताब्यात देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *