युक्रेन युद्ध परिस्थीतीमुळे भारताच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामाबाबत केंद्र सरकारचा अभ्यास सुरु

Govt assessing the impact of ongoing Ukraine crisis on exports; says FM Nirmala Sitharaman

युक्रेन युद्ध परिस्थीतीमुळे भारताच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामाबाबत केंद्र सरकारचा अभ्यास सुरुFM Nirmala Sitharaman

चेन्नई :  युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धग्रस्त स्थितीमुळे भारताच्या निर्यातीवर कशा स्वरुपाचा परिणाम झाला आहे, याबाबत केंद्र सरकारनं अभ्यास सुरु केला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
त्या आज चेन्नई इथं अर्थसंकल्पाविषयी आयोजित उद्योजकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. या परिस्थितीमुळे रशिया आणि युक्रेनकडून होणाऱ्या आयातीपेक्षा, तिथे भारताकडून होत असलेल्या निर्यातीला, विशेषतः कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे, यासोबतच आधी निर्यात केलेल्या मालाचा मोबदला मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

या परिस्थितीमुळे विपरीत परिणाम झालेल्या, सर्वच विभागांशी संबंधित,आयात आणि निर्यात प्रकरणांची, केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. यासंदर्भातला अभ्यास पूर्ण झाल्यावर, सरकार आयतदार आणि निर्यातदारांना मदत करण्याच्यादृष्टीनं, योग्य तोडग्याबाबत प्रतिसाद देईल असं त्या म्हणाल्या.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *