युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचलं

A special plane carrying students stranded in Ukraine reached New Delhi

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचलंA special plane from Ukraine

नवी दिल्ल : युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विशेष विमान आज संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचलं. त्यात राज्यातल्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनानं सहायक कक्ष सुरू केला आहे. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी यूक्रेनच्या शेजारील ४ देशांमध्ये भारताचे विशेष दूत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ताप अरिंदम बागची यांनी आज नवी दिल्लीलत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. हवाई वाहतूक मंत्री ज्योरतिरादित्य् सिंधिया रोमानियाला, केंद्रीय कायदे मंत्री मंत्री किरेन रिजिजू स्लोरवाकियाला,केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप पुरी हंगेरीला रवाना होतील.

नागरीहवाई वाहतूक  राज्यो मंत्री जनरल वी  के सिंह पोलंडला जातील.

हे विशेष दूत यूक्रेनमधून भारतीय नागरिकोंना सुरक्षितपरत आणण्यासाठीच्या कार्यात समन्वयय साधतील. आव्हान आहेत तरीही भारतानं गेल्या २४ तासात आपल्या नागरिकाना तिथून बाहेर काढण्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत सुमारे ८ हजारापेक्षा जास्त भारतीयांनी युक्रेन सोडलं आहे. ६ विमानातून सुमारे १ हजार ४०० भारतीयांना स्वदेशी आणलं असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं.

हंगेरी सीमारेषेजवळून निर्वासन प्रक्रियेत वाढ करण्यात येणार असल्याचं बागची यानी सांगितलं. मोल्दोवा इथून नवीन मार्ग खुला झाला असल्याचंही ते म्हंणाले. मोल्दोवा इथे एक दल  पोहोचल असून रोमेनिया इथून निर्वासन प्रक्रिया सुरु होण्यासाठी ते मदत करणार आहेत .दक्षिण युक्रेन मधल्या भारतीयांना या मार्गाचा उपयोग होईल असं बागची म्हणाले. पुढच्या २४ तासात ३ अतिरिक्त विमान उड्डाण उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापैकी २ बुखारेस्टहून आणि १ बुडापेस्टहून सुटेल.

ऑपेरेशन गंगा अंतर्गत कोणाकडूनही कोणतंही शुल्क आकारल  जाणार नाही असं बागची यांनी स्पष्ट केलं.  दरम्यान भारत युक्रेनला औषधांसह इतर मदतही  करणार असल्याचं  ते म्हणाले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *