Power cut campaign launched in the state
राज्यात वीज तोड मोहिम सुरू
अकोला : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात असून, वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावं, अस आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल केलं.
वीज बिल न भरणाऱ्या सर्वांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. त्यात कुणालाही सवलत दिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात काल झालेल्या विविध कार्यक्रमांच्या वेळी ते बोलत होते.
वीज बिल न भरणाऱ्यांची वीज तोडण्याची मोहिम राज्यात सुरू आहे. त्यावरुन अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.